मुंबईत अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीकडून अटकसत्र सुरू

एनसीबीकडून जैद नावाच्या ड्रग डीलरला आज अटक करण्यात आली आहे. जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शौविकच्या संपर्कात होता. जैदने अनेकदा शौविकला अंमली पदार्थांची डिलीव्हरी केल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला NCB लवकरच ताब्यात घेणार आहे अस बोलले जात आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात विविध प्रकारच्या घडामोडी समोर येत आहेत. आता अंमली पदार्थ तस्करींबाबत NCB कडून मुंबईत अटकसत्र सुरू आहेत. यामध्ये रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण शौविक चक्रवर्तीचे(Showik Chakraborty) आणखी कनेक्शन उघडकीस आले आहे. जैद आणि बशीद अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. मात्र आता याप्रकरणात जैद या ड्रग डीलरची पहिली अटक करण्यात आली.

एनसीबीकडून जैद नावाच्या ड्रग डीलरला आज अटक करण्यात आली आहे. जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शौविकच्या संपर्कात होता. जैदने अनेकदा शौविकला अंमली पदार्थांची डिलीव्हरी केल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला NCB लवकरच ताब्यात घेणार आहे अस बोलले जात आहे.

तसेच आज सकाळी बशीद परिहार नावाच्या एका २० वर्षीय तरुणाला देखील अंमली पदार्थ प्रकरणी NCBने अटक केली आहे. बशीद आणि शौविकचे खास संबंध असून शौविक, बशीद आणि जैद अशी तिघांची जोडी होती.