‘या’ गायिकेने दिला मुलाला जन्म, नवऱ्याने रोमॅंटिक फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी!

निहार म्हणतो, “माझ्या सुंदर पत्नीने मला माझ्या वडिलांनी जे शिकवले ते आमच्या मुलाला शिकवण्याची संधी दिली. ती रोज माझ्या आयुष्यात प्रेम पसरवत आहे. नीती आणि आमचे बाळ निरोगी आहेत.

    लोकप्रिय गायिका निती मोहन आणि अभिनेता निहार पांड्या यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नितीने बुधवारी मुलाला जन्म दिला. बाबा निहारने ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. निहारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नीती सोबत एक रोमॅंटिक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nihaar Pandya (@nihaarpandya)

    निहार म्हणतो, “माझ्या सुंदर पत्नीने मला माझ्या वडिलांनी जे शिकवले ते आमच्या मुलाला शिकवण्याची संधी दिली. ती रोज माझ्या आयुष्यात प्रेम पसरवत आहे. नीती आणि आमचे बाळ निरोगी आहेत. आज या पावसाळी आणि ढगाळ दिवशी आमच्या घरी ‘सन-राइज’ झाला आहे, संपूर्ण मोहन व पांड्या कुटुंबीयांकडून देव, डॉक्टर, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सर्व हितचिंतकांची मनापासून आभार आणि प्रेम केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18) 

    निहार आणि नीति यांचे १५ फेब्रुवारी २०१९ ला झाले. फेब्रुवारी महिन्यात नीतिच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. वेडिंग अॅनिवर्सरीच्या दिवशी नीतिने निहारसोबत एक फोटो शेअर करत गर्भवती असल्याची बातमी दिली. “१ + १ = ३ आई आणि बाबा होणार आहोत. आमच्या दुसर्‍या वेडिंग अॅनिवर्सरीच्या दिवसा पेक्षा दुसरा कोणता दिवस उत्तम असेल”, अशा आशयाचे कॅप्शन हे नीतिने दिले.