केवळ १४ वर्षांच्या असताना अभिनेत्री नितू सिंग पडल्या ऋषी कपूर यांच्या प्रेमात पण पुढे असं घडलं की..

नीतू कपूर १४ वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं. इथूनच त्यांची मैत्री झाली आणि पुढे याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नात्यातही एकेकाळी दरी निर्माण झाली होती.

    अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. ८ जुलैला दिल्लीमध्ये नीतू यांचा जन्म झाला. नीतू यांचं खरं नाव हरमीत कौर असं आहे. नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून नीतू कपूर यांनी ‘रिक्शेवाला’ या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ घातली. प्रेक्षकांप्रमाणेच नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांना देखील भुरळ घातली.

    …आणि ब्रेकअप झालं

    नीतू कपूर १४ वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं. इथूनच त्यांची मैत्री झाली आणि पुढे याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नात्यातही एकेकाळी दरी निर्माण झाली होती. त्याचं ब्रेकअप झालं होतं. ही गोष्ट ‘झूठा ही सही’ सिनेमाच्या शूटिंग वेळीची आहे. यावेळी दोघही एकमेकांसोबत बोलत नव्हते. यावेळी रडून रडून नीतू कपूर यांची अवस्था खराब झाली होती. एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले, “झूठा कहीं का या सिनेमातील आमच्या गाण्याचं शूटिंग सुरु होतं तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. आमचं भांडण झालं होतं. हे गाणं शूट करण्यासाठी चार दिवस लागले. मात्र एकही दिवस आम्ही एकमेकांशी बोललो नाही. मात्र जर तुम्ही हे गाणं पाहिलं तर तुमच्या ते लक्षातही येणार नाही. तुम्हाला वाटेल दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत.”

    तर नीतू कपूर यांनी देखील या सिनेमाच्या आणि त्यांच्या ब्रेकअपच्या आठवणी एका मुलाखतीत ताज्या केल्या होत्या. आम्ही गाण्यामध्ये डान्स करताना आणि आनंदी असल्याचे दिसत आहोत. पण त्यावेळी आमचा ब्रेकअप झालं होतं. मी मेकअप रुममध्ये एकीकडे रडत होते आणि दुसरीकडे डॉक्टर मला इंजेक्शन देत होते’ असं त्या म्हणाल्या होत्या.