लेक रणबीरच्या गाण्यावर नीतू कपूरचा धमाकेदार डान्स, VIdeo होतोय व्हायरल!

या व्हिडीओवर युजर्स कमेंट्सचा वर्षाव करत असून मोठ्या प्रमाणात लाइक्स  मिळत आहेत. ज्या संख्येने या व्हिडीओला लाइक्स मिळत आहेत

     ‘सुपर डान्सर 4′ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येतोय. यंदा यावेळी सर्व स्पर्धक एकापेक्षा एक परफॉरमन्स देताना दिसतील. या शोमध्ये फिल्ममेकर अनुराग बासु, बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूर हे सर्वजण परिक्षकाच्या खूर्चीत बसून स्पर्धकांचं परिक्षण करणार आहेत. यंदाच्या एपिसोडमध्ये ७० ते ८० दशकातील काळ गाजवणारी अभिनेत्री नीतू कपूर गेस्ट जज बनून एन्ट्री करणार आहेत. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

    सोनी टीव्हीने त्यांच्या ऑफिशिअलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नीतू कपूर म्हणतात, “ज्या ज्या वेळी या शोमध्ये कुणी पाहूणे येतात, त्या त्या वेळी त्यांच्यासोबत दादा (अनुराग बासु) डान्स करतात. मला दादांचा रिदम खूप आवडतो. मला माझ्या मुलाच्या एका गाण्यावर दादांसोबत डान्स करायचाय.” अभिनेत्री नीतू कपुरने केलेल्या विनंतीनंतर अनुराग बासु स्टेजवर येतात आणि दोघेही रणबीर कपूरच्या ‘गलती से मिस्टेक’या गाण्यावर धमाकेदार डान्स करतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

    या व्हिडीओवर युजर्स कमेंट्सचा वर्षाव करत असून मोठ्या प्रमाणात लाइक्स  मिळत आहेत. ज्या संख्येने या व्हिडीओला लाइक्स मिळत आहेत, त्यावरून येणारा एपिसोड पाहण्यासाठी लोकांची किती उत्कुता असेल, याचा अंदाज येतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ३९ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.