‘तुझा स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करशील का? नेहा धुपियाने केली त्याची इच्छा पुर्ण, फोटो केला शेअर!

आम्हाला ब्रेस्टफीडिंगला सामान्य बनवायचं आहे. आपल्या देशात महिलांना अनेकदा अशा समस्यांचा सामना करवा लागतो. ही कमेंट त्याचं उदाहण आहे.” असं ती म्हणाली.

  अभिनेत्री नेहा धुपिया सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना अनेकदा सडेतोड उत्तर देते. नुकतच एका युजरने नेहाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एक पोस्ट शेअर करत नेहाने या युजरची बोलती बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या मुलीला ब्रेस्टफीडिंग करतानाचा म्हणजेच स्तनपान करतानाचा फोटो शेअर केला होता.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

  एका युजरने “तुम्ही तुमचा ब्रेस्टफीडिंगचा व्हिडीओ शेअर करू शकता का? नम्र विनंती आहे.” युजरने केलेल्या या कमेंटचा स्क्रीनशॉट नेहाने शेअर केला आहे. सोबतच तिने बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यात नेहा म्हणाली, “मी सहसा अशा कमेंट डिलीट करते किंवा दूर्लक्ष करते. पण मुद्दाम मी ती समोर आणतेय. अशा व्यक्तींमुळे ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या मातांना लाजीरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

  हा फोटो शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ” नव्या आईचा प्रवास असा असतो की तो फक्त तिच समजू शकते. आपण फक्त आनंद पाहतो. पण दुसरीकडे खूप जबाबदाऱ्या आणि विविध भावनांनी पूर्ण स्थिती असते. आई होणं खूप कठीण असून ती फक्त तिला जे करणं गरजेचं आहे तेच करत असते. तिच्यावर प्रश्न उपस्थित करून तिला ट्रोल करू नये. मी या सर्वातून गेलेय. हे प्रत्येक आईवर आहे की ती बाळाला कसं स्तनपान किंवा फीड करू इच्छिते. आपण कायम पाहिलं आहे की अनेक जण आईच्या ब्रेस्टफीडिंगकडे सेक्शुअली पाहतात. त्यामुळे महिला घाबरतात किंवा लाजतात. आम्हाला ब्रेस्टफीडिंगला सामान्य बनवायचं आहे. आपल्या देशात महिलांना अनेकदा अशा समस्यांचा सामना करवा लागतो. ही कमेंट त्याचं उदाहण आहे.” असं ती म्हणाली.