हे आहे नेहाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य, नेहाच्या नवीन पोस्टनंतर चाहते वैतागले!

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने शुक्रवारी नवरा रोहनप्रीत सिंहसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत आहे. त्यामुळे नेहा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसंच नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती असही म्हटलं जात होतं. मात्र आता नेहाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पण या सगळ्यांवर नेहाने खुलासा केला आहे.

नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत आहे. हा फोटो नव्या गाण्याचा एक बाग असल्याचं स्पष्ट केलं आहे. नेहाच्या आगामी गाण्याचं नाव ‘खयाल रख्या कर’ असं असून हे गाणं २२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीत सिंहदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

१८ डिसेंबरला नेहाने रोहनप्रीतसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप दिसत होतं. त्यासोबतच तिने खयाल रख्या कर असं कॅप्शन दिलं होतं. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत. नेहाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील कमेंट केली आहे. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे. नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत.