…म्हणून नेहा कक्कर यापुढे कधीही Reality Show चं परिक्षण करताना दिसणार नाही!

नेहा इंडियन आयडलच्या २ ऱ्या पर्वाची स्पर्धेत होती. तर इंडियन आयडलच्या १० पर्वात नेहा परिक्षक झाली. तेव्हा पासून आता १२ व्या पर्वापर्यंत नेहा ही परिक्षक आहे. यापूर्वी नेहा २०१७मध्ये सा रे गा मा पा लिटिलचॅम्पची परिक्षक होती.

    आपल्या गोड आवाजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. कमी वयात तीने आपलं नाव केलं. नेहा इंडियन आयडल या रिअॅलिटी शोच्या परिक्षकाची जबाबदारी पार पाडतं आहे. लवकरच याचा होळी स्पेशल भाग दाखवला जाणार आहे. त्या आधी त्याचा एक प्रोमो दाखवण्यात आला. त्या प्रोमोमध्ये नेहाने एक मोठे घोषणा केली आहे. नेहा या पुढे कोणत्याही रिअॅलिटी शोची परिक्षक होणार नाही असं ती म्हणाली आहे.

    नेहा इंडियन आयडलच्या २ ऱ्या पर्वाची स्पर्धेत होती. तर इंडियन आयडलच्या १० पर्वात नेहा परिक्षक झाली. तेव्हा पासून आता १२ व्या पर्वापर्यंत नेहा ही परिक्षक आहे. यापूर्वी नेहा २०१७मध्ये सा रे गा मा पा लिटिलचॅम्पची परिक्षक होती.

    काय आहे प्रोमोत

    नेहा कक्कर ही ‘नयना’, ‘प्यार दो प्यार लो’ आणि ‘बद्री की दुल्हनिया’ या गाण्यांवर स्पर्धक निहाल आणि पवनदीप यांच्यासोबत गाणं गातांना दिसते. तिच्या आवाजाने सगळे मंत्रमुग्ध होतात आणि तिला दाद देतात. हे पाहून नेहा भावूक होते. हा शो तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. “इंडियन आयडल माझ्या हृदयाच्या जवळ आणि खूप खास आहे. या शोने मला खूप काही दिलं आहे. म्हणून हा शो सोडून मी दुसरा कोणताही शो करणार नाही.