वाढदिवासाच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला क्यूट ‘रसना गर्ल’ने, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणालेली…

१४ मे २०१२ मध्ये तरूणीचा १४ वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात १६ भारतीय, २ डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते.

    आय लव्ह यू रसना म्हणत सर्वांचं मनं जिंकणारी क्यूट रसना गर्ल तुम्हाला आठवते का? या क्यूट गर्लचं नाव आहे तरूणी सचदेव. दुर्देवाने ही गर्ल आज आपल्यात नाही. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तीने जगाचा निरोप घेतला. वाढदिवसाच्या दिवशीच तरूणीवर काळाने झडप घातली आणि तरूणी हे जग सोडून गेली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, तरूणीने अगोदरच तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.

    १४ मे २०१२ मध्ये तरूणीचा १४ वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात १६ भारतीय, २ डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते. अचानक सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास या विमानाला अपघात झाला व विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. त्या अपघातात १५ लोक ठार झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता़ विमानातील सहा प्रवासी मात्र सुदैवाने बचावले होते.

    आधीच केली होती भविष्यवाणी

    नेपाळला जाण्यापूर्वी तरूणीने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारत निरोप घेतला होता. ‘ही आपली शेवटची भेट आहे…’, असे मित्रांना मिठी मारताना ती मस्करी म्हणाली होती. तिचे हे शब्द सर्वांनी हसण्यावर नेले पण ती भेट खरोखरच शेवटची भेट ठरली. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होत़े. तिच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, तरुणी याआधी अनेकदा ट्रिपवर गेली होती. पण त्यापूर्वी कधीही तिने त्यांना मिठी मारली नव्हती किंवा असा निरोप घेतला नव्हता.

    तरूणीच्या अचानक जाण्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यासारख्या उत्पादनांसाठी अनेक दूरदर्शन जाहिरातींमध्ये तरूणीने काम केले होते. तरुणीने स्वत: मंदिरातील अनेक उत्सवांच्या अनेक नाटकांमध्येही भाग घेतला होता. तरूणी वयाच्या ५ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली. आणि तीही तिच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार ठरली होती.