नेटफ्लिक्स भारतात करत आहे स्वस्त मोबाइल प्लानची चाचणी

नेटफ्लिक्सने भारतात नवीन Mobile+ प्लानची चाचणी सुरू केली आहे. या नवीन नेटफ्लिक्स प्लानची महिन्याची किंमत ३४९ रुपये असणार आहे. यात HD स्ट्रीमिंगचा सपोर्टही मिळणार आहे.

मुंबई : नेटफ्लिक्सने भारतात नवीन Mobile+ प्लानची चाचणी सुरू केली आहे. या नवीन नेटफ्लिक्स प्लानची महिन्याची किंमत ३४९ रुपये असणार आहे. यात HD स्ट्रीमिंगचा सपोर्टही मिळणार आहे. 

हा नवीन नेटफ्लिक्स प्लान आता चाचणी स्वरुपात आहे. यामुळे अनेकांच्या तो लक्षातही येणार नाही. या सब्सक्रिप्शन प्लानमध्ये कोणताही फोन, टॅबलेट किंवा कंप्युटरमध्ये HD स्ट्रीमिंग सपोर्ट मिळणार आहे. पण एकावेळी फक्त एकाच डिव्हाइसवर याचा वापर करता येणार आहे.

नेटफ्लिक्सद्वारे भारतात सादर करण्यात आलेला हा दुसरा मोबाइल प्लान आहे. यापूर्वी कंपनीने गेल्यावर्षी वर्षाला १९९ रुपयांचा मोबाइल प्लान लाँच केला होता. यासोबतच SD स्ट्रीमिंगचा पर्यायही देण्यात आला होता.

हा नवीन नेटफ्लिक्स प्लान अँड्रॉइड प्योर सपोर्टवर सर्वात प्रथम दिसला होता. हा प्लान ४९९ च्या मासिक किंमतीच्या प्राथमिक नेटफ्लिक्स प्लानपेक्षा स्वस्त आहे. प्राथमिक नेटफ्लिक्स प्लान मध्ये  HD कंटेन्ट सपोर्ट मिळत नाही आणि हा एकावेळी एकाच डिव्हाइसवर वापरता येऊ शकतो. तसं पाहता या प्लानमध्ये हा फरक आहे की, यामुळे नेटफ्लिक्स टीव्हीवरही पाहता येणार आहे.

नेटफ्लिक्स ने एका निवेदनात म्हटले आहे की, जर या नवीन प्लानला जास्तीत जास्त लोकांनी पसंती दिली तर हा प्लान दीर्घकाळ सुरू राहील.

नेटफ्लिक्सकडे ६४९ रुपयांचा महिन्यासाठीचा स्टँडर्ड प्लानही आहे. हा HD स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगसोबत येतो आणि यात दोन डिव्हाइसना सपोर्टही मिळतो. कंपनीचा सर्वात महागड्या मंथली प्रिमिअम प्लानची किंमत ७९९ रुपये आहे. यात युजर्सला 4K, HDR आणि UHD कंटेन्ट पाहता येईल. यात ४ स्क्रीनचा सपोर्ट मिळणार आहे.