नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सने नुकतंच 'रेड नोटिस' (Red Notice), 'आर्मी ऑफ द डेड' (Army Of The Dead), 'डोन्‍ट लुक अप' (Don't Look Up), 'टिक ट‍िक.. बूम' (Tik Tik Boom), 'द व्हाईट टाइगर' (The White Tiger), 'द गर्ल ऑन द ट्रेन' (The Girl On The Train) सारख्या बहुचर्चित सिनेमांचे ट्रेलर लाँच केले आहेत. नेटफ्ल‍िक्‍स वर्षभरात प्रदर्शित करणार असलेल्या या ७० सिनेमांपैकी ५२ इंग्रजी सिनेमे, ८ अ‍ॅनिमेटेड सिनेमे आणि १० नॉन-इंग्रजी सिनेमांचा समावेश असणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक प्रेक्षकांनी OTT प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आहे. बऱ्याच देशात अजूनही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघण्यावर सक्ती आहे. गेल्या काही महिन्यात बॉलिवूडचे अनेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. आता OTT प्लॅटफॉर्मही आपले सब्सक्रायबर्स टिकवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहे.

 

याचाच एक भाग म्हणून नेटफ्लिक्सने २०२१ च्या सुरवातीलाच एक भन्नाट घोषणा केली आहे. २०२१ मध्ये नेटफ्लिक्सने प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांना नवीन चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचं आश्वासन दिलय. म्हणजेच या वर्षात नेटफ्लिक्स ७० नवे सिनेमे प्रदर्शित करणार आहे.

नेटफ्लिक्सने नुकतंच ‘रेड नोटिस’ (Red Notice), ‘आर्मी ऑफ द डेड’ (Army Of The Dead), ‘डोन्‍ट लुक अप’ (Don’t Look Up), ‘टिक ट‍िक.. बूम’ (Tik Tik Boom), ‘द व्हाईट टाइगर’ (The White Tiger), ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (The Girl On The Train) सारख्या बहुचर्चित सिनेमांचे ट्रेलर लाँच केले आहेत. नेटफ्ल‍िक्‍स वर्षभरात प्रदर्शित करणार असलेल्या या ७० सिनेमांपैकी ५२ इंग्रजी सिनेमे, ८ अ‍ॅनिमेटेड सिनेमे आणि १० नॉन-इंग्रजी सिनेमांचा समावेश असणार आहे.

नेटफ्लिक्सने पहिल्यांदाच त्यांचा ईयर प्लॅन दर्शकांपुढे मांडला आहे. सध्या नेटफ्लिक्सचे जगभरात २००  कोटींच्या जवळपास सब्सक्रायबर्स आहेत.