ऑक्टोबरपासून सुरु होणार ‘झी’ची नवी वाहिनी – ‘झी वाजवा’

मुंबई:  झी मराठी वाहिनीवरील झी गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये झीने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची म्हणजे एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली आहे. ‘झी वाजवा’ असे या वाहिनीचे नाव आहे. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

सांगीतिक वातावरणामध्ये या वाहिनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. ही वाहिनीदेखील अशाचप्रकारे आपल्या प्रेक्षकांसाठी देखील सांगीतिक वातावरम सादर करणार आहे. “झी वाजवा, क्षण गाजवा”, या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे.

‘झी वाजवा’ वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या.‘ झी वाजवा’ या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून ‘झी’ समूहाचं अभिनंदन केलं.

‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात येत्या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे