santosh juvekar

नव्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे यूकेमध्ये रविवारपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांनी यूकेतून येणारी विमान सेवा बंद केलीये. भारतानेही ब्रिटन बरोबरची हवाई सेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे अनेकांना ब्रिटनमध्येच थांबून रहावे लागणार आहे. यामध्ये मराठमोठा अभिनेता संतोष जुवेकरही आहे.

चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संतोष जुवेकरने काही दिवस ब्रिटनमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. तो या आठवडयात भारतात परतणार होता. पण आता विमाने रद्द झाली आहेत. त्यामुळे तो ब्रिटनमध्ये अडकून पडला आहे. संतोष जुवेकरने त्याचा अनुभव फेसबुकवरुन शेअर केला आहे.

संतोषने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलय

“डेट भेट या माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी २४ नोव्हेंबरला मी ब्रिटनला आलो होतो. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझ्या काही मित्रांना भेटण्यासाठी मी इथेच थांबलो. माझी परतीची २२ डिसेंबरची तिकिट होती. पण लॉकडाउनमुळे विमाने रद्द झाली आहेत. ब्रिटनमध्ये सापडलेला करोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन जास्त संसर्ग पसरवणारा आहे. मी माझी काळजी घेतोय, तुम्ही सुद्धा घ्या”.

सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमेंची सुद्धा ‘डेट भेट’ चित्रपटात भूमिका आहे. लोकेश गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. नुकतच या चित्रपटाचं लंडनमधील शुटींग पुर्ण झालं आहे.