Cold Mess

रिद्धि आणि बरुन हे दोन वेब सुपरस्टार आता ऑल्ट बालाजीसाठी ‘ए कोल्ड मेस’ (A Cold Mess) या शोमध्ये स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. या शोची कथा एका अशा मुलाच्या भोवती फिरते, जो खूप विचार करतो आणि अशा एका मुलीला भेटतो जी खूप काही अनुभवते.

    कंटेंट क्वीन एकता कपूरनं(Ekta Kapoor) ‘ए कोल्ड मेस’ (A Cold Mess)असं शीर्षक असलेल्या आपल्या आगामी रोम-कॉम सीरिजच्या शूटिंगचे(Web Series) काही फोटोज पोस्ट केल्यापासून नेटिजन्सच्या उत्साहाला उधाण आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. एक अशी बातमी जी या गोष्टीला आणखी उत्साहित बनवते ती म्हणजे, रिद्धि डोगरा आणि बरुन सोबती या सिरीजमध्ये पहिल्यांदाच मुख्य जोडीच्या रूपात एकत्र येत आहेत.

    रिद्धि आणि बरुन हे दोन वेब सुपरस्टार आता ऑल्ट बालाजीसाठी ‘एक कोल्ड मेस’ या शोमध्ये स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. या शोची कथा एका अशा मुलाच्या भोवती फिरते, जो खूप विचार करतो आणि अशा एका मुलीला भेटतो जी खूप काही अनुभवते. ऑल्ट बालाजीनं शूटच्या पहिल्या दिवसापासूनच काही इतर बीटीएस फोटोजही प्रसारित केले आहेत, जे नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहेत.

    ‘ए कोल्ड मेस’ तनवीर बुकवाला यांच्या डिंग इन्फिनिटीद्वारा दिग्दर्शित करण्यात आली आहे. ही सीरीज विशेष अशा मॉडर्न नातेसंबंधांवरची विस्मयचकित करणारी कहाणी आहे. शहरी एकटेपणाच्या कॉन्सेटसोबतच, ओल्ड स्कूल क्लासिक्स, फ्लिंग्स आणि प्रेमाच्या बदलत्या परिभाषेसोबत ही कहाणी दोन जीवांची एक कथा सादर करते, जे दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात आणि रोमान्सविषयी दोन टोकाच्या विचारांचं समर्थन करतात.