disha vakani

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच सगळ्यांची लाडकी दया बेन मालिकेत पुन्हा कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. लग्नाच्या निमित्ताने मालिकेतून ब्रेक घेणारी दिशा अडिच वर्षानंतरही परतलेली नाही. या मालिकेत आता नव्या अभिनेत्रीची दया बेनची निवड केली जावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. दरम्यान दया बेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून हिच नवी दया बेन आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by •R O N I T• (@ronit.ashra)

या व्हायरल व्हिडिओत अभिनेता रोहित आसरा दया बेनची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो हुबेबुब दिशा वकानीसारखा अभिनय करत आहे. त्याचा हा अनोखा अभिनय पाहून याचीच दयाबेन म्हणून निवड करावी असा गंमतीशीर सल्ला चाहते निर्मात्यांना देत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हसून हसून वेडे व्हाल.

View this post on Instagram

A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेला मोठा चाहता वर्ग आहे. ही मालिका टीआरपी मध्ये कायम एक नंबरवर असते.

View this post on Instagram

A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal)