धक धक गर्लची पुन्हा चाहत्यांवर मोहिनी…माधुरीच्या नवीन फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!

वाढत्या वयासोबतच माधुरीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

  आपल्या सौंदर्याने आणि आपल्या नृत्याने चाहत्यांच्या मनावर बूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे धक-धक गर्ल माधुरी दीक्षित. बॉलिवूडची ही अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

  वाढत्या वयासोबतच माधुरीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोंना कायमच चाहत्यांची पसंती मिळते. ९० मधील या हिरोईनचे या काळात अनेक चाहते आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

  नुकतेच माधुरीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये माधुरीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा स्कर्ट ड्रेस त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत आहे. माधुरीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)