‘शूटिंग बंद केले जाणार नाही पण….’ चित्रपटसृष्टीसाठी नवीन नियमावली जाहीर!

शूटिंग वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे व यावर विविध संघटनांनी लक्ष ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली.

    राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीसाठीही नवीन नियमावली तयार करण्यात आलीये. याविषयी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे,सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सचिव, या क्षेत्रातील विविध युनियन, महामंडळ यांचे सदस्य, दिग्दर्शक, कलावंत यांच्याबरोबर बैठक घेतली. यावेळी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.

    यावेळी मुख्यमंत्र्यांनी शूटिंग बंद केले जाणार नाही अशी ग्वाही दिली परंतु लोकांना मरतानाही मी पाहू शकणार नाही असा इशारा ही दिला. शूटिंग वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे व यावर विविध संघटनांनी लक्ष ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली.

    नवीन नियमावली खालीलप्रमाणे

    १-चित्रीकरण कमीत कमी लोकांमध्ये करावे. मॉब सीन शक्यतो टाळावेत.

    २-लोकेशन निवडताना शक्यतो दाट लोकवस्तीची ठिकाणे टाळा. इनडोअर ,आऊटडोअर स्टुडिओज, शहराबाहेरील रिसॉर्ट, बंगले वा तत्सम लोकेशन्स निवडा.

    ३-योग्य ती कायदेशीर परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे.

    ४-शूटिंग चालू असताना लोकेशन सोडून इतरत्र भटकू नये.

    ५-सेट शूटिंग पूर्वी व शूटिंग नंतर सँनिटाइज करावे.

    ६-सेटवर सँनिटायझर, ऑक्सिमीटर, टेंम्परेचर गन अत्यावश्यक बाब म्हणून असावेच. प्रत्येकाची नोंद रोजचे रोज ठेवावी.

    ७-कलावंत सोडून इतरांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. कलावंतांनीही आपला शॉट झाला की मास लावणे बंधनकारक आहे.

    ८-वेळोवेळी ईक्विपमेंट सँनिटाइज करावे.

    ९-पर्यावरण पूरक असे साहित्य चहा, नाष्टा, जेवण यासाठी वापरावे.

    १०-डॉक्टर सेटवर असणे आवश्यक आहे.

    ११-कन्टन्मेन्ट झोनमधील व्यक्तीला शूटिंग ला बोलावू नये.

    १२-जास्तीत जास्त कामगारांना काम मिळावे म्हणून त्यांना रोटेशन पद्धतीने बोलवावे.

    १३- सेटवर पाहणी करण्यासाठी आलेल्या अ.भा.म.चि.म.च्या सदस्याला योग्य सहकार्य करावे.