Shweta shinde

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

 

सध्या मालिकेत देवा राधा आणि कबीरच्या प्रेमासाठी डॉलीबाईंपासून दूर जातोय. पण डॉलीबाईंना आपल्या प्रेमावर विश्वास आहे आणि आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्या प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत. म्हणून त्यांनी देवाच्या प्रेमासाठी एक नवीन आव्हान स्वीकारलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

अक्काचा देवा आणि मोनिका यांचा प्रेमाला विरोध असताना देवाचा सहवास मिळावा म्हणून डॉलीबाई चक्क मोलकरीण बनून देवाच्या घरी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी डॉलीबाईनी स्वतःची वेशभूषा देखील बदलली आहे. आता डॉलीबाईंची ही नवी ओळख त्यांना देवाच्या जवळ नेईल का? ही मोलकरीण म्हणजे डॉलीच आहे हे अक्काच्या लक्षात येईल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)