लतिका झाली आर्ची ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत घेतली सैराट एन्ट्री!

मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे, अभ्याला पैशांची गरज असते. आणि त्यासाठी तो आपली प्राणप्रिय बाईक विकतो. ही गोष्ट जेव्हा लतिकाकाला कळते तेव्हा ती अभ्याची बाईक परत आणते

    सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका अगदी कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. बारीक, रेखीव बांध्याची अभिनेत्री या संकल्पनेला छेद देत, भरभक्कम शरीराची अभिनेत्री या मालिकेत पाहायला मिळाली. अशा आगळ्यावेगळ्या विषयावरच्या या मालिकेने एक नवा आदर्श ठेवला आहे. नुकताचं होणाऱ्या मालिकेच्या भागात लतिका एकदम सैराट पद्धतीने बाईक वरून एन्ट्री घेते.

    सध्या ,मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे, अभ्याला पैशांची गरज असते. आणि त्यासाठी तो आपली प्राणप्रिय बाईक विकतो. ही गोष्ट जेव्हा लतिकाकाला कळते तेव्हा ती अभ्याची बाईक परत आणते. नवीन रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये असचं दाखवण्यात आलं आहे, ‘अभ्या आपल्या मित्राशी बाईक बद्दल सांगून दुखी होतं असतो. आणि तेवढ्यात लतिका त्याचं बाईकवरून अगदी आर्ची सारखी एन्ट्री घेते. हे पाहून अभ्यापण आश्चर्यचकित होतो. अभ्या म्हणतो की फक्त बाईक नाही तर, त्याची ‘मेहबूबा’ आहे.

    त्यानंतर लतिका बाईक घेऊन येताना दिसणार आहे. यावेळी लतिकाच्या सैराट एन्ट्री बघायला प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. त्यामुळे आता लतिका- अभ्याची लव्हस्टोरी फुलणार का हे येत्या भागांमध्ये समजणार आहे.