‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर, अरुंधतीने चक्क संजनाला दिली वॉर्निंग, पाहा Video

स्टार प्रवाहवरील(Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (AAi Kuthe Kay Karte)मालिकेत अरुंधतीची(Arundhati) जागा संजना(Sanjana) घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही प्रमणात ती यात यशस्वीसुद्धा झाली आहे. मात्र मालिकेमध्ये लवकरच एक नवा ट्विस्ट येणार असल्याचं दिसत आहे.

  ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karate) ही मालिका सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत येणारे नवे ट्विस्ट(New Twist In Aai Kuthe Kay Karte) चाहत्यांना आकर्षित करून घेत आहेत. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अरुंधतीने थेट संजनाला धमकीचं दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  स्टार प्रवाहवरील(Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (AAi Kuthe Kay Karte)मालिकेत अरुंधतीची(Arundhati) जागा संजना(Sanjana) घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही प्रमणात ती यात यशस्वीसुद्धा झाली आहे. मात्र मालिकेमध्ये लवकरच एक नवा ट्विस्ट येणार असल्याचं दिसत आहे.

  नुकताच मालिकेचा एका नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये संजना अरुंधतीला आपल्या आणि अनिरुद्धच्या लग्नाची पत्रिका दाखवत आहे. म्हणजेच संजना अरुंधतीच्या पतीसोबतचं आपला संसार थाटायला चालली आहे. तिच्या मुळेच अरुंधती आणि अनिरुद्धच्या नात्यात दुरावा आला आहे. आणि हे प्रकरण चक्क घटस्फोटपर्यंत पोहोचलं आहे. या दोघांनी घटस्फोटसुद्धा घेतला आहे. आणि आत्ता अनिरुद्ध संजनाशी लग्न करत आहे.

  याच लग्नाची पत्रिका संजना अरुंधतीला दाखवून तिला खिजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये अरुंधतीचं नवं रूप पाहायला मिळत आहे. आई अप्पांना आणि माझ्या मुलांना काही त्रास होतं आहे, हे जेव्हा माझ्या कानावर येईल त्या क्षणी मी या घरात परत येईन, आणि तुझ त्याच्याशी लग्न झालं आहे. आणि माझा घटस्फोट झाला आहे. हे मी विसरून जाईन अशी चक्क धमकीच अरुंधतीने संजनाला दिली आहे.