दीपासमोर उघड होणार तनुजाचं खरं रुप, मालिकेमध्ये येणार धमाकेदार ट्विस्ट

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत धक्कादायक वळण येणार आहे. दीपा आणि कार्तिकच्या नात्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तनुजाचं खरं रुप आता दीपा आणि कार्तिकसमोर येणार आहे. कार्तिकची चांगली मैत्रीण म्हणून दीपाने तनुजाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला. मात्र याच तनुजाने दीपाचा विश्वासघात केला.

कार्तिकला दीपापासून वेगळं करण्यासाठी नवनवे प्लॅन्स रचले. शेवटी विजय सत्याचाच होतो असं म्हणतात ते खोटं नाही. तनुजाने रचलेली सगळी कारस्थानं आता उघड होण्याची वेळ आली आहे. खुद्द दीपाच तनुजाला रंगेहाथ पकडणार आहे. तनुजाचा नेमका कोणता प्लॅन्स फसला? दीपासमोर तिचं पितळ कसं उघडं पडलं? तनुजाला तिच्या या कुकर्माची शिक्षा कशी मिळणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उघड होणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘रंग माझा वेगळा’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.