निक कॉर्डेरोचा कोरोनामुळे मृत्यू

लॉस एजंलिस : अभिनेता निक कॉर्डेरोचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. निक यांची पत्नी अमेंडा क्लूट्स यांनी ही माहिती दिली आहे. गेले अनेक आठवडे निक आयसीयूमध्ये होते. आधी त्यांना न्युमोनिया झाला होता. त्यांचा एक पायसुद्धा नंतर अनेक अडचणींमुळे कापावा लागला होता. त्यांच्या फुफ्फुसांचेही प्रत्यारोपण झाले होते. रविवारी निक यांच्या पत्नीने आपल्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सगळ्यांना इन्स्टाग्रामद्वारे सांगितले.

तब्बल ९५ दिवस निक कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. निक आणि अमेंडा यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एल्विस नावाचा एक मुलगा आहे.