या उन्हाळ्यात घरीच राहा आणि सुरक्षित राहा, कारण निकलोडियन घेऊन आलय तुमच्यासाठी भरपूर मनोरंजन!

निक वाहिनीवर प्रँक गँग लहान मुलांचे मनोरंजन करत हास्याची उधळण करत असतानाच, सोनिकवरील पिनाकी अँड हॅपी- द भूत बंधुज मालिकेतील उन्हाळी मौजमजेला एक अनपेक्षित वळण मिळणार आहे. भुतांचे हे मजेशीर व मनोरंजक कुटुंब दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.३० वाजता पूर्णपणे नवीन एपिसोड्सच्या माध्यमातून सोनिकवरील मनोरंजनात भर घालणार आहे.

  निकलोडियन फ्रँचायझी आपल्या सर्वांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा आणि दंग करणाऱ्या कथांच्या माध्यमातून भारतभरातील लक्षावधी छोट्या चाहत्यांचे मनोरंजन करते. मागील वर्षभरात या फ्रँचायझीने अनेक नवीन विभाग म्हणता येतील असे उपक्रम सादर केले आहेत. या उपक्रमांनी मुलांना गुंतवून ठेवले आहे, त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवले आहे, सध्याच्या कसोटीच्या काळात त्यांचे चैतन्य कायम ठेवले आहे आणि त्यायोगे लहान मुले तसेच कुटुंबांचे मनोरंजन करणारा एक जबाबदार प्रसारक हा आपला लौकिक आणखी दृढ केला आहे. निकलोडियनच्या निक व सोनिक या दोन वाहिन्यांनी किड्स एंटरटेन्मेंट विभागात पहिला व दुसरा क्रमांक प्राप्त केल्यामुळे  ही नेतृत्वाची धुरा निकलोडियनच्या हाती कायम राहिली आहे.

  हा उन्हाळाही लहान मुलांसाठी अनेक आव्हाने घेऊन आला आहे, कारण, अद्याप सोशल डिस्टन्सिंग पाळणे, घरात सुरक्षित राहणे भाग आहे. म्हणूनच लहान मुलांना या कठीण स्थितीतही सकारात्मक व आनंदी राहण्यास प्रेरणा देणे ही काळाची गरज आहे. निकलोडियन म्हणूनच घरी असलेल्या लहान मुलांसाठी उन्हाळी मौजमजेचे तसेच अन्य अनेक अविस्मरणीय व मूल्यवान अनुभव #NicktoonsKaSummerDose च्या माध्यमातून घेऊन येत आहे.  ही एक अफलातून कंटेण्ट मालिका असून यात नवीन एपिसोड्स, चित्रपट, अनेकविध मजेशीर उपक्रम व नवोन्मेषकारी उपक्रमांची रेलचेल आहे. यामुळे लहान मुले घरी सुरक्षितही राहतील आणि ती आनंदी व गुंतलेलीही राहतील.

  सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने उन्हाळी गमतीजमतींना जोर आला आहे. त्यातच निक वाहिनी लहान मुलांची आवडती प्रँक गँग गोलमाल ज्युनियर सुरू करत आहे. आता ही खोडकर मंडळी संपूर्णपणे नवीन एपिसोड्च्या माध्यमातून लहान मुलांचे मनोरंजन करणार आहेत. दर सोमवार ते शुक्रवार दुपारी १२.३० वाजता त्यांची अवखळ पळापळ #NickPeSabGolmaalHai या संदेशासह बघायला मिळेल.  एका सळसळत्या मल्टिस्क्रीन अभियानाच्या माध्यमातून या प्रँक गँगच्या गमतींची सर्वत्र चर्चा होणार आहे. यात फ्रँचायझीवरील टीव्ही स्पॉट्सपासून आघाडीच्या जीईसी वाहिन्यांवरील क्रॉस प्रमोशनपर्यंत सर्वांचा समावेश असेल. यूट्यूब, गेमिंग पोर्टल्स आणि सोशल मीडियावरूनही गोलमाल ज्युनिअरची प्रसिद्धी केली जाणार आहे. या आनंदात आणखी भर घालण्याचे काम मॅड ओव्हर डोनट्सशी केलेली अशा प्रकारची एकमेव भागीदारी करणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून गोलमाल ज्युनियर प्रँक गँग डोनट्सचा एक विशेष बॉक्स सादर करून उन्हाळा मजेशीर व चविष्ट करणार आहे.

  निक वाहिनीवर प्रँक गँग लहान मुलांचे मनोरंजन करत हास्याची उधळण करत असतानाच, सोनिकवरील पिनाकी अँड हॅपी- द भूत बंधुज मालिकेतील उन्हाळी मौजमजेला एक अनपेक्षित वळण मिळणार आहे. भुतांचे हे मजेशीर व मनोरंजक कुटुंब दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.३० वाजता पूर्णपणे नवीन एपिसोड्सच्या माध्यमातून सोनिकवरील मनोरंजनात भर घालणार आहे. या मजेशीर मित्रांची ओळख करून देणारे अभियानही मल्टिस्क्रीन पद्धतीने राबवले जाणार आहे. यामध्ये टीव्हीवरील अभियानाला वायटीसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे केलेल्या प्रमोशनची जोड दिली जाणार आहे. हे भूतबंधू नंतर काही उपक्रमांच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रत्यक्ष आणले जातील. यात लहान मुले मजेशीर भूतबंधूंचे टंग ट्विस्टर चॅलेंज घेऊन मजा करताना दिसणार आहेत (#BBTT Challenge). याशिवाय अनेकविध नवोन्मेषकारी डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून मुले घरी आरामात बसून आनंद लुटू शकतील खात्री केली जाणार आहे.

  निकलोडियन फ्रँचायझीवर उन्हाळ्यात अनेक नवीन एपिसोड्स व चित्रपटांचा झगमगाट आहे. अवखळ गोलमाल गँग, सर्वांचे आवडते मोटू पतलू आणि जादुई रुद्र निक वाहिनीवरील पूर्णपणे नवीन एपिसोड्सच्या माध्यमातून लहान मुलांचे मनोरंजन करणार आहेत. सुपर कूल पिनाकी अँड हॅपी- द भूत बंधूस, शिवा, निंजा हातोरी आणि झिग अँड शार्को नवीन गोष्टींच्या माध्यमातून सोनिक वाहिनीवरून मजेत आणखी भर घालणार आहेत. यामुळे लहान मुलांना आनंद लुटण्यासाठी अनेक कारणे मिळणार आहेत. याशिवाय निक एचडीप्लसवर लाउड हाउसचे नवीन एपिसोड्स दाखवले जाणार आहेत, तर निकज्युनियरवर तुमची लाडकी व लोकप्रिय पेपा पिग मनोरंजनाचा कळस गाठणार आहे. याचा अर्थ चार भिंतीत राहावे लागले तरीही मुलांचा वेळ मजेत जाणार आहे. रुद्रा त्याचा सुपरहिट चित्रपट ‘दल लॅण्ड ऑफ नो व्हेअर’च्या माध्यमातून उन्हाळी सुट्यांमध्ये जादू फुंकणार असल्याने चित्रपटांच्या विभागातही खूप मनोरंजन आहे. तर मिनी मुव्ही- “द सिक्रेट मिशन ऑफ मोटू पतलू”मध्ये मजेत बागडून मोटू पतलू मुलांचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर निक वाहिनीवर मेमध्ये होणार आहे. याशिवाय तुमच्या आवडत्या टून्सचे नवीन एपिसोड्स आणि चित्रपट आमच्या व्हूट किड्स या फन-लर्न किड्स एंटरटेन्मेंट अॅपवरही उपलब्ध असतील.

  व्हायकॉम१८ च्या किड्स क्लस्टरमधील कंटेण्ट, प्रोग्रामिक व स्ट्रॅटेजी विभागाच्या प्रमुख अनू सिक्का उन्हाळ्यात मुलांचे मनोरंजन करण्याबद्दल म्हणाल्या, “निकलोडियनमध्ये आमचा भर सध्याच्या कसोटीच्या काळात मुलांचे मनोरंजन करत राहण्यावर आहे. उन्हाळा हा मुलांसाठी विशेष कालखंड असतो आणि आम्ही सध्याच्या काळातही मुलांचा वेळ छान जाईल आणि त्याची मन:स्थितीही उत्तम राहील अशा रितीने मजेशीर व रोमांचक गोष्टींची दमदार कन्‍टेन्‍ट श्रेणी तयार केली आहे. आमचे काम मुलांना आनंदी ठेवणे आहे आणि आमच्या निकटून्सच्या विस्तृत व बुडवून टाकणाऱ्या गोष्टी हे साध्य करतील अशी आम्हाला खात्री आहे. आमच्या निकटून्सच्या गोष्टी त्यांना कल्पना व मजेच्या जगात घेऊन जातील आणि त्यांचे चैतन्य कायम राखतानाच त्यांना सुटी साजरी करण्याची कारणेही मिळवून देतील.”

  व्हायकॉम१८ वरील किड्स एंटरटेन्मेंट क्लस्टरच्या मार्केटिंग प्रमुख सोनाली भट्टाचार्य मुलांना उन्हाळ्यात गुंतवून ठेवण्याबद्दल म्हणाल्या, “या विभागातील आघाडीची कंपनी आणि एक जबाबदार प्रसारक म्हणून लहान मुलांना गुंतवून ठेवण्याची व सध्याच्या कठीण काळात त्यांची मानसिकता सकारात्मक राखण्याची महत्त्वाची भूमिका आम्ही पार पाडली पाहिजे असे आम्हाला वाटते. यासाठी आम्ही आमच्या मार्केटिंग योजना नव्याने आखल्या आहेत, त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. आम्ही मल्टिस्क्रीन झालो असून त्या माध्यमातून मुलांना घरातील सुरक्षित वातावरणात बसवून त्यांचे मनोरंजन करण्यावर आमचा भर आहे. आमच्या नवोन्मेषकारी उन्हाळी उत्पादनांमुळे आमचे छोटे प्रेक्षक आनंदी व आशावादी राहतील, याबद्दल आम्हाला खात्री आहे.”

  उन्हाळ्याची सुरुवातच वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन वीकने झाली. यात निकज्युनियरने प्ले डेटच्या सहयोगाने लहान मुलांना घरातल्या घरात आपल्या सृजनशीलतेला वाट देण्यास प्रोत्साहन दिले. यासाठी संगीत व हालचाल, कोडिंग अॅडव्हेंचर, क्ले डो, मिस्टरी पार्टीज, चॉकलेट मेकिंग यांसारख्या अनेक खास विकसित केलेल्या कार्यक्रमांचे माध्यम वापरण्यात आले. मदर्स डे, योगदिन आदी विशेष निमित्त साधून रोचक व्हर्च्युअल अॅक्टिवेशन्स यापुढेही घेतली जातील. यामुळे लहान मुले व त्यांच्या कुटुंबांसाठी अनेक स्मरणीय व आनंदी क्षण निर्माण होतील. यातील प्रत्येक संवाद लोकप्रिय निकटून्सद्वारे डिजिटल पद्धतीने जिवंत करण्यात येईल. त्यामुळे लहान मुलांसाठी प्रत्येक दिवस नक्कीच प्रसन्नता घेऊन येईल.