jaypur pink panthers

सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’(sons of the soil: jaypur pink panthers) या डॉक्युसीरीजचा प्रीमियर ४ डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉन प्राईम(amazon prime व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन याच्या मालकीची जयपूर पिंक पँथर्सवरील ‘सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’(sons of the soil: jaypur pink panthers) या डॉक्युसीरीजचा प्रीमियर ४ डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉन प्राईम(amazon prime व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या अ‍ॅमेझॉन ओरिजिनल डॉक्युसीरीजमध्ये छोट्याशा शहरातील कबड्डीपटूंचा आजवरचा प्रवास आणि त्यांचे या खेळाचे स्वप्न साकार करण्यातील त्याग याचे चित्रण करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचा कबड्डीपटू निलेश साळुंखे याचे आयुष्य या खेळाने कसे बदलले त्याविषयी तो सांगतो की, “मी अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे. माझ्याकडे राहण्यासाठी योग्य घर नव्हते. मी आणि माझे कुटुंब राहत होतो ते अगदी लहान घर होते. आज मी जिथे आहे तिथे पोचणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप संघर्ष केला आहे. प्रशिक्षकांनी मला साथ दिली आहे, योग्य आहार घेण्यासाठीदेखील माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते, ज्यासाठी माझ्या प्रशिक्षकांनी मला मदत केली. माझा महिंद्रा आणि महिंद्रा, आणि एअर इंडिया यांच्यासोबत करार होता. मी महा कबड्डी देखील खेळलो जिथे मी अनेक उत्कृष्ट पारितोषिके मिळवली आहेत.”

तो पुढे म्हणाला की, “प्रो कबड्डीमध्ये आल्यानंतर मी नवीन घर विकत घेतले. मी इतर संघात असताना मला नेहमी जयपूर पिंक पँथर्सकडून खेळण्याची इच्छा होती आणि मला मागच्या वर्षी ही संधी मिळाली. मी चार वेळा नॅशनल खेळलो आहे आणि मला जेपीपीकडून खेळणे सुरू ठेवण्याची इच्छा आहे. माझा प्रवास सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’ या डॉक्युसीरीजमध्ये बघायला मिळेल.”

या मालिकेची निर्मिती बीबीसी स्टुडिओ इंडियाने केली असून बाफटा स्कॉटलंडचा दोन वेळा विजेता राहिलेल्या अ‍ॅलेक्स गेल दिग्दर्शित ही मालिका प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील जयपूर पिंक पँथर्सचा प्रेरणादायक प्रवास चित्रित करीत आहे. अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरिज ‘सन्स ऑफ द सॉईलः जयपूर पिंक पॅंथर्स’चा प्रीमियर ४ डिसेंबरपासून प्राइम व्हिडिओवर २०० हून अधिक देशांमध्ये व प्रांतांमध्ये दिसणार आहे.