नऊ वर्षांच्या संशोधनानंतर तयार झाली ‘ओम नमः शिवाय’ मालिका

कलर्स वाहिनीवर पुन:प्रसारित होत असलेल्या ओम नमः शिवाय या मालिकेत कुठलीही कमतरता राहू नये यासाठी तब्बल नऊ वर्षे विविध पातळ्यावर संशोधन केले. या मालिकेची निर्मिती कशी झाली, यावरील एक लघुपट सध्या

 कलर्स वाहिनीवर पुन:प्रसारित होत असलेल्या ओम नमः शिवाय या मालिकेत कुठलीही कमतरता राहू नये यासाठी तब्बल नऊ वर्षे विविध पातळ्यावर संशोधन केले. या मालिकेची निर्मिती कशी झाली, यावरील एक लघुपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मालिकेने छोट्या पातळीवर अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये खास लोकाग्रहास्तव या मालिकेच्या पुन:प्रसारणास सुरुवात होत आहे.

कलर्स या हिंदी वाहिनीवर ही मालिका पुन्हा दाखविण्यात येणार आहे. त्याबद्दल धीरज कुमार या मालिकेच्या काही आठवणी सांगत होते. ते म्हणाले, की ओम नमः शिवाय शो १९९६ ला प्रसारित झाला. मात्र शोच्या चित्रीकरण अगोदर १९८७ पासून आम्ही विविध संदर्भ व संशोधन सुरु केले होते. आम्ही बडोद्याच्या ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूटच्या मधुसूदन पाठक यांचे यासाठी साह्य घेतले होते. आम्ही बागबान लिहिणाऱ्या अचला नागर आणि इतर क्लासिक पौराणिक शोवर काम करणारे डॉ. राही मासूम रझा या निष्णात व तज्ज्ञ व्यक्ती आमच्या सोबत होते . तसेच पौराणिक शोमधील मास्टर असलेल्या दर्शन लाड यांनाही आम्ही आमच्या टीममध्ये घेतले. श्री. पाठक यांच्या सहकार्यातूनच तत्कालीन वेद, उपनिषदे आणि महत्वाचे पुराण यावर अधिक भर देऊन सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली व त्यामुळे पटकथेला बळ मिळाल्याचे धीरज कुमार यांनी सांगितले. आम्ही पटकथेवर तब्बल नऊ वर्षे काम केले आहे. एखाद्या धार्मिक किंवा पौराणिक मालिकेच्या संशोधनासाठी इतका कालावधी लागण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी, असे ते म्हणाले.