‘कंगना तो एक बहाना है’, नितेश राणे

बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही” असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ने मुंबई (mumbai) वरुन केलेल्या वक्तव्यावरुन वाद (Dispute over statement) निर्माण झाला आहे. तिच्यावर राजकीय (political) आणि सिनेसृष्टीतून (cine world) जोरदार टीका सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली (kankavli) चे भाजपा आमदार (bjp mla) नितेश राणे(nitesh rane) यांनी एक सूचक टि्वट (tweet) केले आहे. संजय राऊत(sanjay raut) यांच्याबरोबरच्या वादात कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली. त्यामुळे तिला इतरांच्या टीकेला सोमोरे जावे लागले आहे.

नितेश राणे यांनी शायरीच्या अंदाजात टि्वट करून निशाणा साधला आहे. “कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही” असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

या संपूर्ण वादात खासकरुन शिवसेना नेत्यांकडून कंगनाला लक्ष्य केले जात आहे. संजय राऊत यांनी कंगनाला सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे असती तर आमच्या रणरागिणी तिचे थोडाब फोडल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.

नेमका वाद काय?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती.

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे.