oscar award

ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. या आधी बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातही ‘नोमडलँड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

    ९३वा अकॅडमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’ सिनेमाने बाजी मारली. तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘नोमडलँड’ चित्रपटाला मिळाला.

    या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. या आधी बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातही ‘नोमडलँड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

    काय आहे कथा

    घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. पतीच्या निधनानंतर एकटी पडलेली साठ वर्षीय फर्न एका व्हॅनमध्ये राहते. ती एका गोदामात काम करते. त्यानंतर मिळेल तिथे वाट सोधत तिचा प्रवास सुरू होतो. काही काळासाठी ती गावोगावी हिंडणाऱ्या भटक्या समाजातील टोळ्यांमध्ये सामील होते. मात्र पुन्हा एकदा ती एकटीच संपूर्ण देशात ती फिरते. मिळेल ते काम करत परिस्थितीशी जुळवत समाधानाचं आयुष्य जगणाऱ्या फर्नची ही कथा अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

    ऑस्कर विजेत्यांची यादी:

    सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘नोमेडलँड’

    सर्वोत्कृष्ट अभिनेते : अँथनी हॉपकिंस (‘द फादर’)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)

    सर्वोत्कृष्ट फिल्म् एडिटिंग : ‘साऊंड ऑफ मेटल’

    सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन: ‘मँक’

    सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ‘मँक’

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग

    सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट : ‘सोल’