alia-bhatt

आलियानं स्टुडंट ऑफ द ईयर या सुपरहिट चित्रपटानंतर हायवे, २ स्टेट्स, गोइंग होम, कपूर अँड सन्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उडता पंजाब, राझी आणि गल्ली बॉय या चित्रपटांमध्ये तिनं केलेला अभिनय पाहून समिक्षकांनी देखील तिची स्तुती केली.

  बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलियाचा आज २८ वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. आलियाचा जन्म १९९३ साली मुंबईत झाला होता. तिचे वडिल महेश भट्ट हे निर्माता असल्यामुळं लहानपणापासूनच घरात चित्रपट मनोरंजनाचं वातावरण होतं. आलियानं वयाच्या २० व्या वर्षी स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. पण तुम्हाला माहितेय का स्टुडंट ऑफ ईयर या चित्रपटापूर्वीच तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  आलियाला अभिनयाची प्रचंड आवड होती. चित्रपटात काम करण्यासाठी तिनं चक्क शाळा देखील सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर तिच्या हट्ट्ला वैतागून महेश भट्ट यांनी तिला संघर्ष या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यावेळी आलिया केवळ सहा वर्षांची होती. बालकलाकार म्हणून झळकेल्या अभिनेत्रीनं या चित्रपटात रीत ओबेरॉय ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यानंतर आलियानं प्रथम शिक्षण पुर्ण करुन मगच चित्रपटात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  आलियानं स्टुडंट ऑफ द ईयर या सुपरहिट चित्रपटानंतर हायवे, २ स्टेट्स, गोइंग होम, कपूर अँड सन्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उडता पंजाब, राझी आणि गल्ली बॉय या चित्रपटांमध्ये तिनं केलेला अभिनय पाहून समिक्षकांनी देखील तिची स्तुती केली. लवकरच आलिया ब्रम्हास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर बरोबर झळकणार आहे. तसेच अनेक बिग ब़जेट चित्रपट आलियाच्या खात्यात जमा होणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)