‘आलिया’ नको ‘या’ व्यक्तीशी लग्न कर, ऋषी कपूर यांनी फोटो शेअर करत दिला होता रणबीरला सल्ला!

२०१८ मध्ये ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रणबीर कपूर त्याचा सर्वात चांगला मित्र आणि अयान मुखर्जी सोबत दिसला होता.

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. पूर्वी दोघे त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळत असत आणि एकमेकांना केवळ चांगले मित्र म्हणत. पण आता रणबीरने सर्वांना आपल्या नात्याबद्दल सांगितले आहे. आलिया कपूर रणबीर कपूरच्या कुटूंबासमवेत वेळ घालवताना नेहमी दिसते. पण ऋषी कपूरला आलिया नाही तर रणबीरचे ‘या’ व्यक्तीशी लग्न व्हावे अशी इच्छा होती.

    २०१८ मध्ये ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रणबीर कपूर त्याचा सर्वात चांगला मित्र आणि अयान मुखर्जी सोबत दिसला होता. ऋषी कपूर यांनी तो फोटो शेअर करुन, रणबीरने आपल्या जिवलग ‘मित्रा’बरोबरच लग्न करावे, असा सल्ला दिला होता. ‘बेस्ट फ्रेंड्स. आता जर तुम्ही दोघांनीच लग्न केले, तर काय होईल? हाय टाईम.’ सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    अभिनेत्री आलिया भट्ट रणबीरसोबत त्याच्या कठीण काळात उभी राहिली आहे. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. या दरम्यान आलिया भट्ट नेहमीच रणबीरसोबत दिसली. इतकेच नाही, तर ती रणबीरच्या कुटूंबाचीही खास काळजीही घेत होती. काही काळापूर्वी रणबीरने आलियासोबतच्या आपल्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, कोरोना महामारी आली नसती, तर त्याचे आणि आलियाचे लग्न झाले असते. या मुलाखतीत रणबीरने आलियाबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल सर्वांना सांगितले होते. अलीकडेच दोघे सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते.