mouni roy

राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नेहमीच अर्थव्यवस्था, गुंतवणूक, बाजारपेठेतील ट्रेंड या संबंधीत पोस्ट असतात. तर यावेळी एनएसईने या संबंधीत नाही तर मौनी रॉयचे फोटो शेअर केले आहेत. मौनीचे हे फोटोपाहून तिचे चाहते हैराण झाले आणि त्यांनी एनएसईला ट्रोल केलं.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉयची मालिकांपेक्षा तिच्या बोल्डनेसची चर्चा अधिक असते. मौनी अनेकदा तिचे बोल्ड फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ करत असते. मात्र, आता मौनी नाही तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मौनीचे फोटो शेअर केले गेले आहेत. हे ट्विट व्हायरल होताच ते डिलीट करण्यात आलं.

राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नेहमीच अर्थव्यवस्था, गुंतवणूक, बाजारपेठेतील ट्रेंड या संबंधीत पोस्ट असतात. तर यावेळी एनएसईने या संबंधीत नाही तर मौनी रॉयचे फोटो शेअर केले आहेत. मौनीचे हे फोटोपाहून तिचे चाहते हैराण झाले आणि त्यांनी एनएसईला ट्रोल केलं.

त्यानंतर एनएसईने माफी मागितली, “आज एनएसई हँडलवरून रात्री १२:२५ वाजता चुकीची पोस्ट करण्यात आली. एनएसईचे ट्विटर हँडल सांभाळणाऱ्या एजन्सीने केलेली ही चूक होती आणि यात कोणतही हॅकिंग वगैरेचा प्रकार नव्हता. आमच्या फॉलोअर्सना झालेल्या गैरसोयीबद्ल आम्ही माफी मागतो”, असं ट्विट करत त्यांनी स्पष्टीकरण दिलं.


एनएसईने जरी माफी मागितली असली तरी हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याचे स्क्रीनशॉट अनेक युजर्सकडून शेअर करण्यात आले आहेत.