दीपिका – भन्साळी पुन्हा एकत्र, सुपरहिट चित्रपटासाठी तयारी सुरू, सिनेमाचं नावही ठरलं!

दीपिकाने याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.

  अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अनेक हीट चित्रपट दिले आहेत. आता त्यांच्या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता भन्साळी आणि दीपिका पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस संजय लीला भन्साळी हे त्यांचे जुने प्रोजेक्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘हिरा मंडी’ यामध्ये व्यस्त होते. पण आता त्यांच्या नव्या चित्रपटांची लवकरच घोषणा होणार आहे. यात दीपिका एका राणीची भूमिका साकरणार आहे. ‘बैजू बावरा’ अस या चित्रपटाचं नाव असणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  ‘रुपमती’ ही भूमिका दीपिका साकारणार आहे. दीपिका आणि भन्साळी यांनी या चित्रपटासाठी अनेकदा चर्चा तसंच भेटीही घेतल्या आहेत. अजून पेपरवर्क बाकी असलं, तरीही दोघांनीही चित्रपटासाठी सहमती दर्शवली आहे. लवकरच चित्रपटाच्या इतर कामकाजालाही सुरूवात होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  चित्रपट पुढील वर्षी मे ते जूनच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९५२ चा चित्रपट ‘बैजू बावरा’चं हे नव रुप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिकाने याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.