अक्षय कुमार-नुपूर सॅनॉनच्या केमिस्ट्रीने चाहते भारावले, गाणं बघताना डोळ्यात तरळलं पाणी!

अक्षय-नुपूरच्या या नवीन गाण्याचे नाव ‘फिलहाल 2 मोहब्बत’ आहे. अक्षय आणि नूपुरचं नातं आणि दुःखाने भरलेलं गाणे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

  गायक बी प्राक याने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या हृदयात घर केले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बी प्राकने अक्षय कुमार आणि नुपूर सॅनॉनची गाणी चाहत्यांसमोर सादर केली. आता या गाण्याचा दुसरा भाग चाहत्यांसमोर सादर करण्यात आला आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज ‘फिलहाल 2’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  अक्षय-नुपूरच्या या नवीन गाण्याचे नाव ‘फिलहाल 2 मोहब्बत’ आहे. अक्षय आणि नूपुरचं नातं आणि दुःखाने भरलेलं गाणे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अक्षय आणि नुपूर यांनी स्वत: ‘फिलहाल 2’ हे गाणे चाहत्यांसाठी शेअर केले आहे. बी प्राक याच्या या नवीन गाण्यात दोन प्रेमींची कथा सादर केली गेली आहे, ज्यांना काही कारणास्तव वेगळे व्हावे लागले. गाण्यात असे दर्शवले गेले आहे की, मुलगी लग्न करते आणि नंतर मुलगा विचारतो की, तरीही तू माझ्यावर प्रेम करतेस का? गाणे केवळ या कथेभोवतीच फिरत असल्याचे दिसते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  गायक बी प्राक याने ‘फिलहाल 2 मोहब्बत’ हे गाणे गायले असून, त्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अक्षय आणि नुपूरच्या प्रेमाची केमिस्ट्री पुन्हा चाहत्यांची मने जिंकत आहे, हे गाणे खूपच सुंदररित्या चित्रीत करण्यात आले आहे.