नुसरतच हॉररगिरी, ‘छोरी’साठी पाहिले १० भयपट!

या चित्रपटाचं ४० दिवसांचं शूट मागच्या वर्षी डिसेंबरमध्येच पूर्ण करण्यात आलं होतं. सध्या याचं डबिंग सुरू आहे.

    काही कलाकारांची सध्या जबरदस्त चलती आहे. अशांपैकी एक आहे नुसरत भरूचा. नुसरत भविष्यातील महत्त्वपूर्ण प्रोजेक्टसमध्ये आघाडीच्या कलाकारांसोबत झळकणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथील करण्यात आल्यानं मनोरंजन विश्वातील काही कामांना गती मिळू लागली आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करत कलाकार-तंत्रज्ञ पुन्हा कामावर परतू लागले आहेत. नुसरतनंही नुकतीच आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

    तिने ‘छोरी’ या आगामी हिंदी चित्रपटाचं डबिंग सुरू केलं आहे. या चित्रपटाचं टायटल लक्षवेधी असून, स्त्रीप्रधान कथानकाचे संकेत देणारं आहे. नुसरतही या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचं ४० दिवसांचं शूट मागच्या वर्षी डिसेंबरमध्येच पूर्ण करण्यात आलं होतं. सध्या याचं डबिंग सुरू आहे. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा शहरात शूट झालेला हा हॉरर चित्रपट आहे.

    या चित्रपटातील व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी नुसरतनं बराच रिसर्च आणि स्टडी केल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. हॉररचा अनुभव घेता यावा यासाठी तिनं तब्बल १० चित्रपट पाहिल्याची माहिती मिळाली आहे.