अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँचे लग्न अवैध? म्हणे आम्ही तुर्की कायद्यानुसार एकत्र आलो!

मी कोलकाता येथे दिवाणी खटला दाखल केला आहे आणि तो कोर्टात असेपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही.’ पुढे निखिल यांनी ते दोघे नोव्हेंबर २०२० पासून वेगळे झाले असल्याचे सांगितले आहे.

  अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या गर्भवती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत या पती निखिल जैनपासून वेगळ्या राहत आहेत.  दरम्यान नुसरत यांनी “निखिल जैनशी झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता” असा खुलासा केला. आता निखिल जैनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  काय म्हणाल्या नुसरत जहाँ

  आमचं लग्न तुर्की कायद्यानुसार झालं होतं. ते भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार वैध होणं आवश्यक होतं. पण ते झालं नाही. इथल्या कायद्यानुसार ते लग्न नव्हतं, तर फक्त एक नातं किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होतं. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो आहोत. फक्त मी त्यावर भाष्य टाळलं होतं. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही”, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं.

  दरम्यान नुसरत यांनी त्यांचा निखिल जैनसोबत झालेला विवाह हा तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे असे म्हटले होते. आता त्यावर त्यांचा पती निखिल जैन यांनी वक्तव्य केले आहे.

  नुसरत यांनी त्यांचा निखिल जैनसोबत झालेला विवाह हा तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे असे म्हटले होते. आता त्यावर त्यांचा पती निखिल जैन यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘ती जे काही म्हणाली आहे त्यावर मला प्रतिक्रिया देण्याची इच्छा नाही. कारण हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. मी कोलकाता येथे दिवाणी खटला दाखल केला आहे आणि तो कोर्टात असेपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही.’ पुढे निखिल यांनी ते दोघे नोव्हेंबर २०२० पासून वेगळे झाले असल्याचे सांगितले आहे.

  दरम्यान, नुसरत जहाँ यांनी आपल्या पैशांचा आपल्या परवानगीशिवाय वापर होत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले दागिने, त्यांनी स्वत:च्या कमाईतून घेतलेले दागिने, कपडे, बॅग्ज आणि इतर गोष्टी निखिल यांनी त्यांच्याकडेच ठेऊन घेतल्या आहेत असे नुसरत जहाँ म्हणाल्या.