sushant singh rajputs vescera report

सिनेमा रिया आणि सुशांत यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा असून, त्यांची केमिस्ट्री दर्शवणारा आहे. केवळ न्यायावर भाष्य न करता हा रियाबाबतही बरंच काही सांगणारा असल्याची माहिती मिळाली आहे. अमन वर्मा आणि असरानी देखील या सिनेमात आहेत.

    अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण सध्या चौकशी आणि न्यायालयाच्या अधीन असल्यानं सर्वांना या खटल्याच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. रीअल लाईफमध्ये सुशांतच्या नातेवाईकांना न्याय कधी मिळेल हे सांगता येणार नाही, पण रील लाईफमध्ये त्याला एप्रिल महिन्यात ‘न्याय’ मिळणार आहे.

    दिग्दर्शक दिलीप गुलाटी यांनी सुशांतच्या आत्महत्येचं रहस्य पडद्यावर सादर करणाऱ्या ‘न्याय : द जस्टीस’ या हिंदी सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. हा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. यात सुशांतची भूमिका झुबेर के. खान या अभिनेत्यानं साकारली असून, रिया चक्रवर्तीच्या भूमिकेत श्रेया शुक्ला आहे. हा सिनेमा रिया आणि सुशांत यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा असून, त्यांची केमिस्ट्री दर्शवणारा आहे. केवळ न्यायावर भाष्य न करता हा रियाबाबतही बरंच काही सांगणारा असल्याची माहिती मिळाली आहे. अमन वर्मा आणि असरानी देखील या सिनेमात आहेत.

    चाहत्याची कोर्टात याचिका

    चाहत्याने या चित्रपटाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने मात्र याचिकेवरील सुनावणीच्या वेळी या चित्रपटात नेमके काय दाखवले जाणार आहे हे तुम्हाला कसे माहीत, अशी विचारणा याचिकाकर्त्यांला केली. तसेच याचिके वर तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नसल्याचे नमूद करत ती तहकूब केली.

    सुशांतच्या मृत्युचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. वकील अशोक सरोगी यांच्या पत्नी सरला आणि राहुल शर्मा यांच्या निर्मिती संस्थेने सुशांतच्या आयुष्यावर आधारित ‘न्याय- द जस्टीस’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. मात्र हा चित्रपट राज्यातील सध्याच्या सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकतो, सुशांतच्या बाबतीतही चित्रपटात काही कल्पित घटनांचा समावेश असू शकतो. आपण सुशांतचे चाहते असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कायमस्वरूपी स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे.