‘ओह माय गॉड’च्या सिक्वेलची तयारी सुरू, अक्षय कुमार पुन्हा घेणार दैवी अवतार!

आता अक्षय पुन्हा एकदा दैवी रूपात प्रगटणार आहे. उमेश शुक्लांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'ओह माय गॉड'च्या सिक्वेलची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

    एखादा चित्रपट हिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये चांगलाचा रुजला आहे. २०१२ मध्ये रिलीज झालेला ‘ओह माय गाँड’ हा चित्रपट सर्वांना आठवत असेलच. बऱ्याच जणांनी हा चित्रपट पुन: पुन्हाही पाहिला असेल. आजवर नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारनं या चित्रपटात दैवी अवतार धारण केला होता. अक्षयनं साकारलेल्या आधुनिक रूपातील कृष्णाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं.

    आता अक्षय पुन्हा एकदा दैवी रूपात प्रगटणार आहे. उमेश शुक्लांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘ओह माय गॉड’च्या सिक्वेलची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. याच चित्रपटासाठी अक्षय पुन्हा दैवी रूपात दर्शन देणार आहे. ‘ओह माय गॉड २’चं दिग्दर्शन अमित राय करणार आहे. अमितनं यापूर्वी ‘रोड टू संगम’चं दिग्दर्शन केलं आहे

    . याखेरीज ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ आणि ‘आय-पॅड’ या शॉर्टफिल्म्सचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं अमितच्या व्हीजनमधून अक्षय कशाप्रकारे कृष्ण साकारतो ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.