OMG! Yeh Mera India, भेटा ७६ वर्षांच्या अशा एका मुंबईकराला, ज्यांच्याकडे आहे खजिना!

पुढील एपिसोडमध्ये किशोर झुनझुनवाला यांचा संग्रह दाखविण्यात येणार आहे. त्यात १०० हून अधिक कॅटेगरींमधील २५,००० हून अधिक वस्तू पाहायला मिळणार आहेत. 

    महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य नेते होतेचत्याचप्रमाणे त्यांनी जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिलीत्यांचा वारसा सर्वज्ञात आहे आणि त्यांचे विचार आणि शिकवण आजही जगभरातील अनेक देशांमधील लोकांच्या हृदयात आणि मनात कायम आहेजगभरात गांधीची स्मतीचिन्हे अनेक ठिकाणी आहेतमहात्मा गांधींच्या वस्तूंची स्वतंत्र वस्तूसंग्रहालयेसुद्धा आहेतमहात्मा गांधींच्या सर्वाधिक वस्तू असलेले खासगी संग्राहक आहेत किशोर झुनझुनवाला हे मुंबईकर. HistoryTV18 वरील OMG! Yeh Mera India या सोमवारी रात्री  वाजता प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना महात्मा गांधींच्या अनेक वस्तूत्यांच्याशी संबंधित मौल्यवान साठा म्हणजेच महात्मा गांधींनी लिहिलेली पत्रेत्यांचे ध्वनिमुद्रणत्यांची भाषणेत्यांची आवडती भजने आणि त्यांच्या राखेचा अंश साठवून ठेवलेली छोटीसी डबीसुद्धा पाहता येणार आहे.

    देशभरातील भारतीयांनी साध्य केलेली अतुलनीय कामगिरीत्यांच्या विस्मयकारक आवडीनिवडी आणि स्तिमित करणारी गुणवत्ता हे पैलू HistoryTV18 वर प्रक्षेपित होणाऱ्या OMG! Yeh Mera India या अत्यंत यशस्वी सीरिजमध्ये दाखविण्यात येतातया सोमवारी रात्री  वाजता प्रक्षेपित होणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये किशोर झुनझुनवाला यांचा संग्रह दाखविण्यात येणार आहेत्यात १०० हून अधिक कॅटेगरींमधील २५,००० हून अधिक वस्तू पाहायला मिळणार आहेतयात दुर्मीळ स्टँप्स आणि नाणीइतर देशांमधील पदकेजुन्या वर्तमानपत्रांचे दुर्मीळ मूळ अंक इत्यादी अनेक संग्रहांचा समावेश आहेसांस्कृतिक मंत्रायलायतर्फे मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये या संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले होतेआता HistoryTV18चे प्रेक्षक हा मौल्यवान खजिना घरबसल्या पाहू शकणार आहेत. पुढील भागांमध्ये भरपूर स्केटबोर्डिंग चॅम्पिअन्स असलेले गावऑलिम्पिक पाककला विजेता आणि हवेचे प्रदूषण कमी करणाऱ्या कार्बन टाइल्सचा उद्गाता असे आश्चर्यकारक भारतीय पाहायला मिळणार आहेतहे आणि असे बरेच काही HistoryTV18 वर या सोमवारी रात्री  वाजता नक्की पाहा.