On the second day of the wedding, Dhanashree Dance on Daru badnam karadi song

धनश्री आपल्या सोशल मिडिया अकाटऊंटवरुन डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचा जुना डान्स करत असल्याचा व्हिडिओ पुन्हा व्हारयल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहते प्रतिक्रिया करत आहेत. धनश्री आणि तिचा पती चहल सुद्धा सोशल मिडियावर सक्रिय असतात.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्पिनर वेगवान गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) नुकताच कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) विवाह बंधनात अडकला आहे. दोघांचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. नुकतेच त्यांचे लग्नही झाले आहे. परंतु युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री छान डान्स करते तसेच तिची स्वतःची डान्स अकॅडमीदेखील आहे. धनश्रीचा जुना व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दारु बदनाम करदी (Daru badnam karadi ) या गाण्यावर धनश्री थिरकताना दिसत आहे.

धनश्री वर्मा अतिशय सुंदर डान्सर असून ती एक डॉक्टरसुद्धा आहे. धनश्री आपल्या सोशल मिडिया अकाटऊंटवरुन डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचा जुना डान्स करत असल्याचा व्हिडिओ पुन्हा व्हारयल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहते प्रतिक्रिया करत आहेत. धनश्री आणि तिचा पती चहल सुद्धा सोशल मिडियावर सक्रिय असतात.

धनश्रीच्या या दारु बदनाम करदी गाण्यावरील डान्सच्या व्हिडिओला ७४ लाख लोकांनी पाहिले आहे. तिचे युट्यूबवर २० लाख सब्सक्रायबर्स आहेत. तसेच तिच्या इंन्स्टाग्रामवर देखील २५ लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर देखील ती आपल्या डान्सचे अनेकल व्हिडीओ अपलोड करत असते. नुकतीच ती आयपीएल(IPL) दरम्यान दुबईमध्ये चहल आणि त्याची टीम आरसीबीला चिअर करण्यासाठी यूएईला(UAE) गेली होती. बॉलिवूडमधील गाण्यांवर ती डान्स करते. युजवेंद्र चहल सध्या भारतात असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सिरीजमध्ये(Ind vs Aus) त्याची निवड झालेली नाही. त्यानंतर आता पुढील महिन्यात इंग्लडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यासाठी चहल प्रॅक्टिस सुरु करणार आहे.