रणवीर सिंग, महेंद्र सिंग धोनी नाही तर युवराज सिंगबरोबर झालं असतं दीपिका पदुकोणचं लग्न, पण या कारणामुळे ब्रेकअप झालं आणि…

२००७ मध्ये पहिल्या टी २० वर्ल्ड कपनंतर युवराज आणि दीपिकाची पहिली भेट झाली. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. पण हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

     बॉलिवूड आणि क्रिकेट हे नातं फार जवळचं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधील बऱ्याच जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली- अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे आणि हार्दीक पांड्या नताशा या जोड्यांनी लग्न केलं.  एकेकाळी बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदूकोणचे नाव भारतीय क्रिकेट संघातील महेंद्रसिंग धोनी आणि खेळाडू युवराज सिंगसोबत जोडले गेले होते. त्या दोघांच्या रिलेशनच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

    २००७ मध्ये पहिल्या टी २० वर्ल्ड कपनंतर युवराज आणि दीपिकाची पहिली भेट झाली. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. पण हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते दोघं एकमेकांना डेट करू लागले. एकदा दीपिकाने युवराजसाठी पार्टी देखील होस्ट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण कधीही त्यांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले.

    त्यांच्या ब्रेकअपचे कारण युवराजने एका मुलाखतीमध्ये सांगितले होतं. ‘माझी आणि दीपिकाची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. आम्ही दोघे एकमेकांना आवडत होतो. आम्ही एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्हाला दोघांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता आला नाही. त्यानंतर हळूहळू गोष्टी बदलल्या. दीपिका तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली.’