oscar award

लॉस एंजेलिसला २५ एप्रिल २०२१ ला होणाऱ्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संभ्रमावस्था दिसत आहेत. यंदाचा सोहळा आभासी पध्दतीने करायचा की पारंपारिक पद्धतीने करायचा यावर अजून निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे ऑस्कर सोहळ्याचे आयोजन दोन महिने उशीरा होत आहे.

लवकरच थिएटर्स सुरू होतील आणि जे सिनेमे थिएटर्समध्ये प्रदर्शित होतील ते ऑस्करच्या स्पर्धेत उतरतील. त्यामुळे स्पर्धेत आणखी सिनेमांची टक्कर बघायला मिळेल अशी आयोजकांना आशा आहे. त्यामुळे सध्या तरी ऑस्कर सोहळ्याबदद्ल काही सांगता येणार नाही. नेमका ऑस्कर सोहळा कोणत्या पद्धतीने पार पडेल याबद्दल निश्चित सांगता येणार नाही.

अकॅडमी ऑफ मोशन आर्टस अण्ड सायन्स या संस्थेतर्फे प्रतिष्ठेचे ऑस्कर पुरस्कार दिले जातात. पुढील वर्षीचा सोहळा लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमधून लाईव्ह टेलिकास्ट करण्याचा प्रयत्नात उद्योजक आहेत. मात्र अद्याप यावर काहीच निर्णय झालेला नाही.