त्यांनी सेक्स केला म्हणून….ऑस्कर विजेत्याचा पुरस्कारानंतरचा VIDEO होतोय व्हायरल!

डॅनियेलची आई आणि बहिण त्याचं हे भाषण लंडनमधील युके हबमध्ये ऐकत होत्या. डॅनियेलच्या या विधानानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाली आहे. डॅनियेलचं हे वाक्य ऐकून त्याच्या आईला धक्काच बसला.

    ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमासह तीन पुरस्कार पटकावले आहे. डॅनियेल कालूया या अभिनेत्याला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

    ऑस्कर स्विकारताना अभिनेता डॅनियेलने आभार मानताना पहिल्यांदा देवाचे आभार मानले. मात्र पुढे तो जे काही म्हणाला  त्यानंतर सगळेच चकीत झाले. डॅलियेल म्हणाला, ” आयुष्य सुंदर आहे. माझ्या आई-वडिलांनी शरीर संबध ठेवले म्हणूनच आज मी इथे आहे. हे ऐकताच सगळे थक्क झाले.

    डॅनियेलची आई आणि बहिण त्याचं हे भाषण लंडनमधील युके हबमध्ये ऐकत होत्या. डॅनियेलच्या या विधानानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाली आहे. डॅनियेलचं हे वाक्य ऐकून त्याच्या आईला धक्काच बसला. तर बहिणीला हसू आवरणं कठीण झालं. डॅनियेलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो.