देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या आहे ‘सातव्या आसमानवर’, Video शेअर करत चाहत्यांबरोबर वाटला आनंद!

जगातील सर्वात लोकप्रिय अवॉर्डचा सोमवारी दोन भागात ऑस्कर नॉमिनेशनचे लाइव्ह प्रेझेन्टेशन होणार आहे. यात २३ वेगवेगळ्या विभागात नामांकन होणार आहे. नॉमिनेशनचे प्रसारण Oscars.com, Oscars.org आणि अकॅडमीचे डिजिटल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर ग्लोबल लाइव्ह प्रसारण होणार आहे.

    देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या सातव्या आसामनावर आहे. तीच्या आनंदी असण्यामागे कारणही तसं खास आहे. प्रियंकाने नुकतीच आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. नुकतेच प्रियंकाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात निक जोनसदेखील दिसतो आहे. व्हिडीओत प्रियंकाने सांगितले की, लवकरच होणाऱ्या ९३ व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये नॉमिनेशन्सची घोषणा ते दोघं करणार आहेत.

    व्हिडीओत प्रियंका बोलते आहे की, आम्ही ऑस्कर नामांकन जाहीर करत आहोत. मला सांगितल्या शिवाय आम्ही ऑस्कर नॉमिशन्सची घोषणा करणार आहोत. आम्हाला लाइव्ह पहा. व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये प्रियंका चोप्राने अकादमीला टॅग करत लिहिले की, काय कोणती संधी आहे का की मी ऑस्कर नामांकनची घोषणा एकटी करू शकते? त्यानंतर तिने लिहिले, मस्करी करते आहे.

    जगातील सर्वात लोकप्रिय अवॉर्डचा सोमवारी दोन भागात ऑस्कर नॉमिनेशनचे लाइव्ह प्रेझेन्टेशन होणार आहे. यात २३ वेगवेगळ्या विभागात नामांकन होणार आहे. नॉमिनेशनचे प्रसारण Oscars.com, Oscars.org आणि अकॅडमीचे डिजिटल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर ग्लोबल लाइव्ह प्रसारण होणार आहे. जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळा उशीरा होत आहे. हा सोहळा फेब्रुवारीत पार पडतो. मात्र यावेळी हा पुरस्कार २६ एप्रिलला होणार आहे.