यंदाचा ऑस्कर सोहळा  इतिहास घडवणार, कारण मुस्लीम अभिनेता रिज अहमदला मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन!

२०१७ मध्ये मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अ‍ॅमी पुरस्कार जिंकणारा रिज अहमद पहिला मुस्लिम आणि आशियाई वंशाचा देखील पहिला व्यक्ती ठरला होता. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे

    नुकतीच ऑस्करसाठीच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली. या वर्षी पहिल्यांदाच ऑस्करमधील मुख्य अभिनेत्याच्या विभागात एका मुस्लिम अभिनेत्याला नामांकन देण्यात आलं आहे. रिज अहमद असं या अभिनेत्याचं नाव आहे. चित्रपट ‘साऊंड ऑफ मेटल’साठी या वर्षीचा बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल’ साठी त्याला नामांकन देण्यात आलं आहे. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे.

    या आधी जरी मुस्लिम कलाकारांना ऑस्कर मिळाले आहेत, परंतु लीड अ‍ॅक्टर श्रेणीच्या इतिहासातील हे पहिलेच नामांकन आहे. त्यापूर्वी ऑस्कर पुरस्कार जिंकणारा महर्षला अली हा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला होता. परंतु, २०१७च्या ‘मूनलाईट’ चित्रपटासाठी महर्षलाने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या विभागात हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर याच श्रेणीतील ‘द ग्रीन बुक’ चित्रपटासाठी महर्षला अलीला २०१९ चा ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.

    तसे, २०१७ मध्ये मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अ‍ॅमी पुरस्कार जिंकणारा रिज अहमद पहिला मुस्लिम आणि आशियाई वंशाचा देखील पहिला व्यक्ती ठरला होता. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे आणि त्याने ‘रोग वन’, ‘वेनॉम’, ‘द सिस्टर्स ब्रदर्स’, ‘नाईटक्रॉलर’, ‘फोर लायन्स’ आणि ‘मुगल मोगली’ यासारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

    यावर्षी रिझ अहमदला नामांकन मिळालेल्या ‘साऊंड ऑफ मेटल’ या चित्रपटात त्याने रूबेनची भूमिका साकारली आहे, जो एक रॉक अँड रोल ड्रमर आहे आणि आधीपासूनच व्यसनाधीन व्यक्ती आहे. या भूमिकेसाठी, रिझ अहमद याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’, ‘एसएजी पुरस्कार’, ‘स्पिरिट अवॉर्ड’ आणि ‘बाफ्टा’ या पुरस्कारांच्या स्पर्धेत प्रमुख अभिनेत्याच्या वर्गात नामांकन देण्यात आले आहे.