अनि- मनुच्या गोड संसाराला सुरूवात, या दोघांच्या संसाराला समरची नजर तर नाही लागणार?

प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे.

     अशी अनेक जोडपी आहेत त्यांनी खऱ्या प्रेमाखातर घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न केलं आणि आपला वेगळा संसार मांडला आणि तो संसार यशस्वीपणे चालवत आहेत. असाच काहीसा अनिकेत आणि मनूचा संसार. प्रेमाखातर घरच्यांपासून लपवून लग्न केलं, आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर वळण घेतलंय. नुकताच एकमेकांच्या साथीने संसाराचा श्री गणेशा त्यांनी केला आहे. घरच्यांनी जरी मनापासून त्यांच्या लग्नाला स्वीकारलं नसलं तरी अनिकेत मनूने आशा सोडली नाहीये. त्यांना विश्वास आहे हे चित्र लवकरच बदलणार आहे.

    अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांचं असं लहानसे का होईना पण सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. मनूच्या मनातल्या इच्छा तिने सांगण्या आधीच अनिकेत पूर्णत्वास येतील असा प्रयत्न करणार आहे. अनिकेतच्या ह्या सगळ्या धडपडीचं मनूला फारच कौतुक आहे.. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे.

    पण या गोष्टीमुळे अपमानित आणि सैरभैर झालेला आणि मानसीसाठी ईर्षेला पेटलेला समर, अनिकेत आणि मनूचा संसार सुखी होऊ देईल?