zoya nasir

इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पाकिस्तानची चेष्टा केल्याने क्रिस्टीयन बेत्झमानशी अभिनेत्री झोया नसीरने साखरपुडा(Zoya Nasir call off her engagement) मोडला आहे.

    पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासिरने(Zoya Nasir) तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न तोडले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पाकिस्तानची चेष्टा केल्याने क्रिस्टीयन बेत्झमानशी तिने साखरपुडा(Zoya Nasir call off her engagement) मोडला आहे. तसेच त्याने पाकिस्तानला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हटले आहे. या कारणामुळे झोयाने हा निर्णय घेतला आहे. देश आणि धर्मासाठी झोयाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या कारणामुळे झोया चर्चेत आली आहे.

    क्रिस्टीयन हा जर्मन ब्लॉगर आहे. तो एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात पाकिस्तानविषयी वक्तव्य केलं आहे.

    क्रिस्टीयन म्हणाला, अशा परिस्थितीत प्रार्थना केल्यास काही फायदा होणार नाही. पॅलेस्टाइनचे समर्थन करत आवाज उचलणाऱ्या पाकिस्तानी लोकांनाही क्रिस्टीयनने प्रश्न विचारला आहे. जेव्हा आपण आपल्या स्वत: च्या देशाचा नाश करत असतो, आपला समाज आणि आपल्या लोकांना मदत करु शकत नाही तेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल वाईट वाटून घेणे थांबवा.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Zoya Nasir (@zoyanasir)


    यानंतर झोयाने रविवारी एक पोस्ट करत तिचा निर्णय सांगितला. “क्रिस्टीयन आणि मी आता लग्न करणार नाही अशी घोषणा मी करत आहे. त्याचा माझ्या संस्कृतीकडे, माझ्या देशाबद्दल, लोकांमध्ये आणि माझ्या धर्माप्रती अचानक झालेल्या असंवेदनशील बदलामुळे मला हा कठीण आणि अटल निर्णय घेण्यास प्रवृत्त केले,” असे झोया म्हणाली.


    पुढे ती म्हणाली, “काही धार्मिक आणि सामाजिक सीमा आहेत ज्या ओलांडल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नम्रता, सहनशीलता आणि एकमेकांबद्दल आदर हाच गुण आहे ज्याचे आपण नेहमी पालन केले पाहिजे. या भावनिक संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या अल्लाहकडे प्रार्थना करते,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.