३ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली असतानाही अभिनेत्री फिरतेय जेलबाहेर, इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो, टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर!

तीन वर्षांपूर्वी मी टू चळवळीमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं. अनेक अभिनेत्रींनी नामांकित निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. याच चळवळी दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री मिशा शफी हिनं अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

  अभिनेता अली जाफरवर खोटे लैंगिक आरोप करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री, गायिका मिशा शफी हिला कोर्टानं तब्बल तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र अद्याप मिशा तुरूंगात गेलेली नाहीये. ती अजूनही तुरूंगाबाहेर आहे. तिनं ट्रोल करणाऱ्यांवर टीका केलीये. तुम्ही माझ्या स्वातंत्र्यावर जळताय का? असा सवाल तिने केलाय. मात्र या सर्व प्रकारामुळं पाकिस्तानी कोर्टाच्या न्याय प्रक्रियेवर सवाल उपस्थित झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meesha Shafi (@meesha.shafi)

  मिशानं इंन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती एका महागड्या गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. “हा पाहा माझा फोटो, कोण मुर्ख म्हणतंय मी तुरुंगात जातेय?” अशा आशयाचं कॅप्शन तीने या फोटोला दिलं आहे. त्यानंतर तिनं आणखी एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तिनं ट्रोलर्सच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. “जर एखादी स्त्री तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी बोलली तर तुम्ही तिच्यावर टीका करता त्यामुळंच स्त्रिया होणारा अन्याय शांतपणे सहन करतात.” अशा आशयाचा टोला तिनं लगावला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meesha Shafi (@meesha.shafi)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meesha Shafi (@meesha.shafi)

  काय आहे प्रकरण

  तीन वर्षांपूर्वी मी टू चळवळीमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं. अनेक अभिनेत्रींनी नामांकित निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. याच चळवळी दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री मिशा शफी हिनं अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानं काम देण्याच्या नावाखाली माझा लैंगिक छळ केला असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. या आरोपांविरोधात अलीनं कोर्टाचा धाव घेतली. अन् कोर्टात अभिनेत्रीनं केलेले आरोप खोटे निघाले. परिणामी न्यायाधिशांनी दिला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. परंतु दोन दिवसानंतर मिशा तुरुंगाबाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळं या प्रकरणात नेमकं झाली तरी काय? पाकिस्तानमधील कुठल्या कायद्याअंतर्गत तिची शिक्षा कमी झाली? असे प्रश्न विचारले जात आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meesha Shafi (@meesha.shafi)