लग्नाच्या एक महिन्यातच अभिनेता घेणार घटस्फोट? सोशल मीडियावरची ती पोस्ट होतेय व्हायरल!

पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असे म्हटले आहे. त्यासोबतच हॅशटॅगचा वापर करत ‘Heartbroken’ असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

  अभिनेता अक्षय खरोडियाने १९ जून रोजी गर्लफ्रेंड दिव्या पुनेठाशी लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दरम्यान अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. ही पोस्टपाहून अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात फूट पडली असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असे म्हटले आहे. त्यासोबतच हॅशटॅगचा वापर करत ‘Heartbroken’ असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kharodia (@akshay_kharodia)

  या पोस्टवरुन लग्नाच्या महिनाभरातच अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात फूट तर पडली नाही ना असे म्हटले जात आहे. अक्षयने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान अक्षयने दिव्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे देखील बंद केले आहे. सध्या अक्षयची ही पोस्ट चर्चेत आहे.