‘पानी पानी’ च्या बादशाह, जॅकलीन फर्नांडीस आणि आस्था गिल पुन्हा एकत्र!

हे गाणं बादशाह आणि आस्था यांनी लिहीलं असून, गायलंही आहे. याखेरीज दोघांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बादशाहसोबत जॅकलीन आहे.

    काही कलाकार-तंत्रज्ञ एकत्रितपणे काम करतात आणि यशस्वी होतात. त्यामुळं ठराविक काळानंतर ते जेव्हा पुन्हा एकत्र येतात, तेव्हा सर्वांच्याच अपेक्षा वाढतात. बादशाह, जॅकलीन फर्नांडीस आणि आस्था गिल हे असंच एक त्रिकूट आहे, जे रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी एकत्र आलं आहे. ‘पानी पानी’ या धडाकेबाज डान्स नंबरच्या माध्यमातून बादशाह, जॅकलीन आणि आस्था रसिकांवर मोहिनी घालणार आहे.

    हे गाणं बादशाह आणि आस्था यांनी लिहीलं असून, गायलंही आहे. याखेरीज दोघांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बादशाहसोबत जॅकलीन आहे. या गाण्याचा व्हिडीओ जैसलमेरमध्ये शूट करण्यात आला आहे. या निमित्तानं रसिकांना बादशाह आणि जॅकलीनची केमिस्ट्री अनुभवायला मिळते.

    जॅकलीन सध्या चांगलीच फॅार्ममध्ये आहे. एकीकडं तिच्याकडे बरेच चित्रपट आहेत, तर दुसरीकडे समाजसेवेच्या माध्यमातूनही ती प्रकाशझोतात आहे. आता बादशाहसोबत ‘पानी पानी’ या गाण्यात लक्ष वेधून घेत आहे. बादशाहचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांच्यासाठीही हे गाणं जणू पर्वणी ठरणार आहे.