Rohit Pawar,Pankaja-Munde

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम एकदा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी टेश्नन दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे चला हवा येऊ द्या. या मंचावर कलाकार आपल्या चित्रपटांचं, नाटकांच प्रमोशन करायला येतात. पण येता आठवडा काहीसा वेगळा असणार आहे. कारण चला हवा येऊ द्याच्या मंचावर कोणी कलाकार नाही तर या एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहे.

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम एकदा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी टेश्नन दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे चला हवा येऊ द्या. या मंचावर कलाकार आपल्या चित्रपटांचं, नाटकांच प्रमोशन करायला येतात. पण येता आठवडा काहीसा वेगळा असणार आहे. कारण चला हवा येऊ द्याच्या मंचावर कोणी कलाकार नाही तर या एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहे. महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) शरद पवार यांचे नातू आणि NCP चे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar)- महाराष्टारातील हे युवा चेहरे CHYD च्या मंचावर दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

आता राजकीय चेहरे या मंचावर दिसणार म्हटल्यावर मंचवार राजकीय फटकेबाजी दिसणार की सगळ्यात हस्यात रमणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका नाही पण कोपरखळी तर नक्कीच देतील. सुजय विखे पाटील यांनी कमळ हाती घेतल्यानंतर अशाप्रकारे राजकीय नसणाऱ्या कार्यक्रमात रोहित पवार यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करताना या दोन्ही नेत्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. पंकजा मुंडे यांनी देखील या कार्यक्रमात पती अमित पालवे यांच्याबरोबर उपस्थिती दर्शवली आहे. सुजय विखे पाटील देखील त्यांची पत्नी धनश्री विखे यांच्याबरोबर उपस्थित होते.

खेळ रंगला….

यावेळी उपस्थित जोडप्यांना रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा खेळ खेळण्यास सांगितलं होतं. यामध्ये एक वस्तू घड्याळही होती. आश्चर्याची बाब म्हणजे सुजय विखे यांची पत्नी आणि पंकजा मुंडे यांचे पती या दोघांनीही घड्याळावर रिंग टाकली. यावेळी पंकजा मुंडेनी रोहित पवार यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. त्यांनी असं म्हटलं की, तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका. त्यावर रोहित पवार यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. ‘घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे’, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना उत्तर दिलं आहे.