शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा २’चा ट्रेलर प्रदर्शित, बघाल तर पोट धरून हसाल!

‘हंगामा’ चित्रपटाप्रमाणेच ‘हंगामा २’मध्ये देखील परेव रावल यांचा गोंधळ पाहायला मिळणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक मुलगी लहान बाळ घेऊन बसलेली दिसत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून ‘हंगामा २’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेला, हंगामा या चित्रपटाचा सीक्वल आहे. येत्या २३ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

    ‘हंगामा’ चित्रपटाप्रमाणेच ‘हंगामा २’मध्ये देखील परेव रावल यांचा गोंधळ पाहायला मिळणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक मुलगी लहान बाळ घेऊन बसलेली दिसत आहे. हे बाळ मिजानचे असल्याचे ती म्हणत असते. दरम्यान मिजान आणि शिल्पा खरे शोधत असतात. पण मिजान आणि शिल्पाचे एकत्र फिरणे पाहून परेश रावल यांना पत्नी शिल्पा शेट्टीचे अफेअर सुरु आहे असे वाटते. त्यामुळे ‘हंगामा १’ प्रमाणेच ‘हंगामा २’मध्येही परेश रावल यांचा गोंधळ पाहायला मिळणार.

    ‘हंगामा २’ या चित्रपटात शिल्पा आणि परेश रावल यांच्यासोबत राजपाल यादव, मिजान जाफरी, प्रणिता हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले आहे. हा चित्रपट २३ जुलै रोजी डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीने कमबॅक केला आहे. २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात शिल्पा शेवटची दिसली होती.