कोविड लस घेतल्यानंतरही परेश रावल यांना कोरोनाची लागण, ट्विटरच्या माध्यमातून दिली ‘ही’ माहिती

परेश रावल ६५ वर्षाचे असून ९ मार्च रोजी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी एक फोटोही त्यांनी ट्विट केला होता. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

    अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. रावल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या १० दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी कोरोना चाचणी करावी. असे आवाहनही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

    परेश रावल ६५ वर्षाचे असून ९ मार्च रोजी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी एक फोटोही त्यांनी ट्विट केला होता. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात रणबीर कपूर, मनोजज वाजपेयी, आमिर खान आर माधवन, कार्तिक आर्यन यांचा समावेश आहे.

    दरम्यान परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांनी लस घेतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. V for vaccines, सर्व डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि शास्त्रज्ञांचे आभार, असे ट्वीट त्यांनी केले होते. परेश रावल यांनी ९ मार्चला कोरोना लस घेतली होती. त्यानंतर १८ दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.